ऋणानुबंधांच्या जिथुन पडल्या गाठी,
भेटीत तृष्टता मोठी...
स्मरताच तुम्हा तुम्ही आला
मम अंतर पटलावर ठेला
स्मितहास्या चा प्रसाद मज दिधला
मम हृदयास तृप्तता मोठी.
मन राही ना या अवनी
आनंदे उडू पाहे वर गगनी
प्रेम आले उफाळून तव चरणी
चरणांत तव स्थिरता मोठी
ऋणानुबंधांच्या जिथुन पडल्या गाठी,
भेटीत तृष्टता मोठी.
शुक्रवार, ६/६/२५ ,४:४४ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment