धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
शब्द रुप आले मुक्या भावनांना
तुझे नाम की थेंब हा अमृताचा
तुझे पाद स्पर्श,की स्पर्श हा चांदण्याचा
उगा रुसण्याचा का हा बाहाणा
शब्द रुप आले मुक्या भावनांना
तुझ्या भक्तीची हृदयी जाग आली
तुझ्या भेटीची मम अंतरी हुर झाली
उठे आज ओठी भक्तीचा तराणा
शब्द रुप आले मुक्या भावनांना
मनी रुप तुझे ,व आस दर्शनाची
तृषा वाढते निरंतर लोचनांची
युगांचे मिळावे का रुप या क्षणांना
शब्द रुप आले मुक्या भावनांना
निरंतर फिरसी तू या सर्व अवनी
दिससी न परी का तू मज नयनी
हट्ट सोडी हा,हो प्रगट नयनांना
शब्द रुप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
शब्द रुप आले मुक्या भावनांना
सोमवार, ९/६/२५ , ७:५७ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment