Total Pageviews

21,638

Tuesday, 1 August 2023

सद्गुरू स्तुती -१


 

जया मुखी सद्गुरू नाम
जया मनी सद्गुरू ध्यान
त्यास कैंची  चिंता जाण
गुरू कृपे तो सुखी असे
असा जो भक्त असे गुरु भजनी
तोची जाण तरला भवार्णी
गुरू इच्छे सर्वपरी तयांचा योगक्षेम चालत असे
 
_*_*_*_*_*_*_*_*



गुरू ची माता पिता प्रमाण
गुरू ची सखा निसंकोच जाण
गुरू ची आनंदाची खाण
गुरू कैवल्याची जाण खुण
जे केवळ जगती गुरु प्रिती
तयांची हो जगभर ख्याती
जेवी अत्तराची कुपी दडविताही ना दडे


शनिवार दिनांक १७/६/२०२३
१०:२७ AM


No comments:

Post a Comment