Total Pageviews

Tuesday 1 August 2023

स्तुती दत्ताची


दृष्टी नासिकेसी लक्ष तव चरणी

लागली तंद्री तव नाम:स्मरणी

तव भेटी लागी मन घेई भरारी

तुम्हा विण दत्ता मला कोण तारी

 

🙏🙏

 

काय करावे भवार्णी मज काही कळेना

तुझ्या दर्शनाची तळमळ सुटेना

कोण पुरविल ईच्छा ही जी मज सुखकारी

तुम्हा विण दत्ता मला कोण तारी

 

 

🙏🌹🙏

 

कली चा पसरला प्रभाव या जगात

वाचेल तोच जो सदा नितीवंत

भजा हो सदैव तो एक भगवंत

तीन शिरे ज्यासी,सहा हात बळवंत

 

🙏🌹🙏

शनिवार २९/७/२०२३ , ०३:२५ 

अजय सरदेसाई (मेघ )

 

No comments:

Post a Comment