Total Pageviews

21,646

Tuesday, 1 August 2023

सद्गुरू कराहो माझा स्वीकार


 

मज नोहे कोण गती

मी असे हो मुढ मती

जाणो मी कैसी असे भक्ती

सांग केवी करु तुझी  स्तुती

 

तु असे स्वरुप दया घन

ऐकिले मी सज्जन मुखे करुन

आशा जागृती झाली माझे मन

म्हणुन धरीले तुझे चरण

 

मुढावर करा इतकाच उपकार

सद्गुरू कराहो माझा स्वीकार

देवुन तव चरणांचा आधार

सुखी करा या मुढा जन्मो जन्मी

 

सोमवार ,  गुरु पौर्णिमा

दिनांक: //२०२३

११:५१ AM

No comments:

Post a Comment