Total Pageviews

Friday, 11 August 2023

निघालो घेऊन दत्ताची पालखी


 

निघालो घेऊन दत्ताची पालखी ।

निघालो घेऊन दत्ताची पालखी ।

आम्ही भाग्यवान।आनंद निधान।

आम्ही भाग्यवान।आनंद निधान।

झुलते हळुच हृदयी दत्ताची पालखी I

झुलते हळुच हृदयी दत्ताची पालखी ।

निघालो घेऊन दत्ताची पालखी ।

 

हृदयांत ठेली मुर्ती हो दत्ताची ।

हृदय हो माझे पालखी दत्ताची।I १ ।I

वाहतो हृदयी फुले तव चरणी।

दरवळे सुगंध भक्तांचिया मनी ।I २ ।I 

दिप अनाहतात तेवता हा सतत ।

गोजिरे दत्त नाम गुंजे सहस्रसारात।I ३ ।I

अंजनात हो निळ्या काषाय वस्त्र धारी ।

देई अभय कर हो भक्तांचा कैवारी ।I ४ ।I

लोचनांचे अवचित झाले कॄष्णा तीर ।

दत्त दर्षनाने सुखे संथ वाहे निर ।I ५ ।I

 

निघालो घेऊन दत्ताची पालखी ।

निघालो घेऊन दत्ताची पालखी ।

आम्ही भाग्यवान।आनंद निधान।

आम्ही भाग्यवान।आनंद निधान।

झुलते हळुच हृदयी दत्ताची पालखी I

झुलते हळुच हृदयी दत्ताची पालखी ।

निघालो घेऊन दत्ताची पालखी ।

 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।

 

शुक्रवार,

दिनांक: ११/०८/२०२३

१०:५६ AM

अजय सरदेसाई (मेघ)

🙏❤🙏

No comments:

Post a Comment